Nisarga Mitra Mandal Aurangabad

Tuesday, 9 June 2009

जागतिक पर्यावरण दिना निमीत्य निसर्गामित्र मंडळा तर्फे आयोजीत पर्यावरण संरक्षण प्रभोधन मोहिम व् परिसर स्वच्छता अभियानास नागरिकांनी उत्सपुर्त सहभाग

5 जून ,२००९ या जागतिक पर्यावरण दिना निमित्त्य शाहानुरवाडी येथील शहनाई मंगल कार्यालय जवळ असलेलेल्या मोकळ्या जागेत तसेच गुरुकुंज को-औप सोसाइटी मधील भारत माता मंदिर परिसरात चाटे कोचिंग क्लास चे विद्यार्थी ,चैतन्य हस्स्ययोग संघ ,महानगरपालिका , गुरुकुंज हाऊसिंग सोसाइटी चे विद्यार्थी तसेच परिसरातील निसर्ग प्रेमी नागरिक यांचा सहभागाने परिसर पोलीथिन क्यारिबग्स मुक्त करण्यात आल विघटन न होणारा ह्या एक ट्रक कचरयाचे या वेळी निर्मूलन करण्यात आले त्यानंतर चाटे कोचिंग क्लासच्या विद्यार्थ्याना पर्यावरण संरक्षण ची शपथ देण्यात आली .
या मोहिमेस प्र. विजय दीवान, श्री.किशोर गठडी ,डॉ.पि .एस कुलकर्णी ,श्री दिलीप यार्दी, श्याम दंडे आनघा चिटगोपेकर , महेंद्र देशमुख,हरीश देशमुख,नगरसेवक संजय जोशी, चाटे कोचिंग क्लास चे विनायक सांगले, प्रवीण घुसले,हंगे, आढाव, चैतन्य हस्स्ययोग संघाचे तेजस्विनी शिंदे , जन्गादा, भारती रायबागकर , नलिनी देशमुख,चन्द्रकला पंचगले , महानगर्पलिकेचे वार्ड आधिकारी एस के जोशी ,अशोकसुरड़कर आदि निसर्ग प्रेमी सहभागी जाले होते

Thursday, 4 June 2009

world env day 2009 by Nisarga Mitramandal Aurangabad

Monday, 11 May 2009

Nisarg Mitramandal Aurangabad: तीन केदार गिरिभ्रमण

Nisarg Mitramandal Aurangabad: तीन केदार गिरिभ्रमण

तीन केदार गिरिभ्रमण

निसर्ग मित्र मंडळ औरंगाबाद
तीन केदार गिरिभ्रमण ११ में 2009
येथील निसर्ग मित्र मंडळ तर्फे हिमालयातील उतरांचल प्रदेशातील पंचकेदार पैकी व् भगीरथ व् अलकनंदा ह्या नद्यांच्या परिसरात व्यापलेले केदारनाथ,मदमहेश व् तुंगनाथ येथे गिरिभ्रमण मोहिम आयोजित केली आहे .
दिनांक २१ जून ते ४ जुलाई असा १४ दिवसाच्या ह्या गिरिभ्रमण मोहेमेत ३६८० मीटर उंच असलेले तुंगनाथ हे सर्व केदार पैकी उंची वरील शिवमंदिर आहे.येथे जान्या करीता चोपटा ह्या निसर्ग रम्य ठिकाणाहून सुमारे 3.5 की मी .पद भ्रमण करावे लागते . मदमहेश करीता कालीमठ येथून गौन्धार मार्गे मदमहेश असा अंदाजे 17 व् 10 किमी पायी प्रवास करावा लागतो .मदमहेश हे ३४९० मीटर उंची वर असून येथून नीलकंठ ,चौखम्भा तसेच बुडाकेदार ह्या पर्वत रांगाचे विलोभनीय दृश्य बघवायास मिळते .
हे गिरी भ्रमण शारीरिक दृष्टया सक्षम असलेल्या सर्व नागरिकांसाठी आहे .ह्या गिरी भ्रमण मोहिमेत सहभाग घेऊ इछिनारया निसर्ग प्रेमीनि आधिक माहिती व् नाव नोंदणी साठी खालील ठिकाणी संपर्क साधावा
किशोर गठडी 9422202628
नागेश देशपांडे 9420400383