Nisarga Mitra Mandal Aurangabad

Tuesday, 24 June 2014

निसर्ग मित्र मंडळा तर्फे पावसाळी गिरी भ्रमण तसेच निसर्ग भ्रमण सहली व बीजारोपण कार्यक्रमाची रूपरेषा



                                                                                              दी २१  जून २०१४
निसर्ग मित्र मंडळा तर्फे पावसाळी मोहिम जाहीर

  येथील निसर्ग मित्र मंडळा तर्फे पावसाळी गिरी भ्रमण तसेच निसर्ग भ्रमण सहली व बीजारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.दरवर्षी निसर्ग मित्र मंडळा तर्फे औरंगाबाद , सह्याद्री डोंगररांगा ,हिमालयातील विविध ठिकाणी अभ्यास सहली,गिरिभ्रमण तसेच बीजारोपण मोहिमा गेल्या २५ वर्षापासून सातत्त्याने आयोजित करण्यात येतात.
  निसर्गाची आवड निसर्गरक्षण,सवर्धनाची जाणीव नागरिकां मध्ये निर्माण व्हावी तसेच साहस वृत्ति वाढावी या करीता हे कार्यक्रम मंडळा तर्फे आयोजीत केले जातात.औरंगाबाद परिसरात होणारया भ्रमंतित् नागरिकानी साठवलेल्या बियाचे बीजारोपण करण्यात येते.शारीरिक दृष्टया सक्षम असलेल्या सर्वे वयोगटातील नागरिकांसाठी तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी  विविध संस्था आदि या उपक्रमात् सहभागी होऊ शकतात निसर्ग मित्रमंडळा तर्फे या वर्षी आयोजित होणारया गिरी भ्रमण तसेच निसर्ग भ्रमण सहली व बीजारोपण कार्यक्रमाची रूपरेषा खालील प्रमाणे आहे
1) ०६ जुलै - वेरूळ ते म्हैसमाळ
2) २० जुलै - कोराई गढ लोणावळा
३) २७ जुलै - लोह्गढ नांद्रा फुलंब्री
४) ०३ ऑगस्ट - माळशेजघाट
५) १७ ऑगस्ट - माळशेजघाट
६) २४ ऑगस्ट - गौताळा अभयारण्य  
७) ०७ सप्टे. - पितळखोरा (गौताळा अभयारण्य)
८) २७/२८ सप्टे.- सहस्त्रकुंड नांदेड
१०) ०५ ऑक्टोबर - अंजनडोह(कोजागिरी उत्सव )  
११) १९ ऑक्टोबर - रतनगड              
१२) ०९ नोव्हेंबर - सालेर,मुल्हेरगढ  सटाणा 
१३) २६/२७/२८ डिसेंबर - पन्हाळ गड , विशालगड
१४) जानेवारी कळसुबाई शिखर
१५) जाने- भरतपूर पक्षी अभयारण्य, रंथांबोर व्याघ्र प्रकल्प 
१६) फेब्रुवारी  - चिखलदरा ,मेळघाट व्याघ्र प्रकल्प
१७) मार्च -  नागझिरा   
या कार्यक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या निसर्ग प्रेमिनी खालील क्रमांकावर सपर्क साधावा
२३२९२०३,९४२२२०२६२८, ८४१२९१०४२३   


किशोर गठडी
सचिव

No comments: