Nisarga Mitra Mandal Aurangabad

Monday, 4 April 2016

निसर्ग मित्रमंडळ तर्फे बीज संकलन अभियान

निसर्ग मित्रमंडळ तर्फे बीज संकलन अभियान
येथील निसर्ग निसर्ग मित्र मंडळातर्फे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी बिजसंकलन उपक्रम राबविण्यात येणार आहे ऊन्हाळा संपे पर्यंत जेवढे शक्य होईल तेवढ्या सिताफळ ,अशोक,आंबा,कडुनिंब,बहावा,जांभुळ आदी झाडाच्या बिया निसर्ग मित्रमंडळा च्या स्वयंसेवकांकडे जमा कराव्यात.
जमा झालेल्या सर्व बियांचे मंडळा तर्फे 
पावसाळ्यात आयोजित औरंगाबाद तसेच महाराष्ट्रातील विविध डोंगररांगा व जंगल परिसरात आयोजित निसर्ग भटकंती या कार्यक्रमातून टोचन पद्धतीने लावण्यात येतील .
खालील ठिकाणी संपर्क करून निसर्गप्रेमीनी बिया जमा कराव्यात
किशोर गठडी
9422202628
रंजन देसाई
9422290655
नागेश देशपांडे
9420400383
असे आवाहन निसर्ग मित्रमंडळा तर्फे करण्यात येत आहे
बियांचे संगोपन खालील प्रमाणे हि करता येईल
एक पाटी काळी मऊ केलेली माती त्या मध्ये दोन ग्लास लाल माती वाळुमय मिक्स करीवी. त्या मध्ये एक पाटी शेण घालुन योग्य पाणी घालुन चिखल करावा. चिखलाचे गोळे करुन त्या मध्ये बी आत घालावे . नंतर ते बंद करावे . ऊन्हात वाळवुन चिखल गोळे टणक बनतात.पाऊस सुरु झाल्या नंतर ते गोळे योग्य जागा शोधुन उधळी करु शकता.डोंगर उतार ; माळराणातील कोपर भाग .प्रवास करताना गाडीतुन बाहेर फेकु शकता.चिखल गोळ्या मुळे बियांना मुंग्या . वाळवी लागत नाही कुजत नाहीत .पावसाचे पाणी त्यावर पडतात गोळे ओले होतात .चिखल खतामुळे बी लवकर रुजते.

No comments: