निसर्ग मित्र मंडळातर्फे शाडूमाती गणपती मुर्ती बनवण्याची रविवारी कार्यशाळा
येथील निसर्ग मित्रमंडळा तर्फे तसेच पन्नालालनगर विकास संस्थेच्या सहकार्याने येत्या रविवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी पर्यावरणपूरक शाडू माती गणपती मूर्ती तयार करण्यासाठीची कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे
निसर्ग मित्रमंडळा तर्फे प्रदूषण मुक्त गणेशोत्सव हा उपक्रम गेल्या 15 वर्षा पासून सातत्याने राबविला जातो
या मध्ये प्रामुख्याने नागरिकांमध्ये प्रदूषण मुक्त गणेशोत्सव संदर्भातील जणजागरण,प्लास्टर ऑफ पॅरिस च्या मूर्ती ला पर्यायी पर्यावरणपूरक मूर्ती साठी चे उद्बोधक तसेच विसर्जनाच्या दिवशी शहरातील विविध संघटनांच्या मदतीतीने निर्माल्य संकलन आदी उपक्रम घेतले जातात
पन्नालालनगर विकास संस्थेच्या सहकार्याने आयोजीत ही कार्यशाळा रविवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 11 या दरम्यान श्री अष्टविनायक गणेश मंदिर येथे होणार आहे
या कार्यशाळेत मूर्ती तयार करण्यासाठी लागणाऱ्या शाडू मातीची व्यवस्था करण्यात आली आहे
साेबत आणावयाचे साहीत्य:- जाड पूठ्ठा,पाण्यासाठी मग, रद्दी पेपर,हात पूसण्यासाठी कपडा
या कार्यशाळेत सहभाग घेण्यासाठी अगोदर नाव नोंदवणे आवश्यक आहे .अधिक माहिती व नाव नोंदणी करीता मंडळाचे
श्री नागेश देशपांडे मो.9420400383
तसेच पन्नलाल विकास संस्थेचे अध्यक्ष श्री उदय जैस्वाल मो. 9422217479
येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे
किशोर गठडी
सचिव,निसर्ग मित्र मंडळ औरंगाबाद
No comments:
Post a Comment