Nisarga Mitra Mandal Aurangabad

Sunday, 21 August 2022

निसर्ग मित्र मंडळ आयोजित शाडूमाती गणपती मुर्ती कार्यशाळेला चांगला प्रतिसाद


निसर्ग मित्र मंडळ आयोजित शाडूमाती गणपती मुर्ती  कार्यशाळेला चांगला प्रतिसाद








येथील निसर्ग मित्रमंडळ तसेच जायसवाल महिला संघटन या संस्थेच्या सहकार्याने रविवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी जयसवाल भवन रचनाकार कॉलोनी येथे शाडू माती गणपती मूर्ती तयार करण्यासाठीची कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला महिला व विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला.

सुरवातीला जायसवाल महीला संघटन औरंगाबादच्या अध्यक्षा अर्चना उदय जायसवाल यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले

या प्रसंगी मंडळाचे सचिव किशोर गठडी यांनी शाडूच्या मूर्ती नदीत किंवा विहिरीत विसर्जित करू नका तर ते आपल्या घरीच मूर्तीचे विसर्जन करा असे आवाहन केले त्याच प्रमाणे अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करण्याचा उद्देश हा नागरिकानमधे निसर्ग संवर्धनाची जाणीव निर्माण व्हावी हा असून निसर्ग मित्रमंडळा तर्फे  दर वर्षी  प्रदूषण मुक्त  गणेशोत्सव हा उपक्रम गेल्या 20 वर्षा पासून सातत्याने राबविला जातो असे ही त्यांनी नमूद केले.


अशा उपक्रमाद्वारे प्रामुख्याने नागरिकांमध्ये प्रदूषण मुक्त गणेशोत्सव  संदर्भातील जनजागरण,प्लास्टर ऑफ पॅरिस च्या मूर्ती ला पर्यायी पर्यावरणपूरक मूर्ती साठी चे उद्बोधन; तसेच विसर्जनाच्या दिवशी शहरातील विविध संघटनांच्या मदतीने निर्माल्य संकलन आदी उपक्रम घेतले जातात.

या कार्यशाळेत प्रामुख्याने सौ श्रद्धा गाजरे यांनी सहभागीना गणेश मूर्ती तयार करण्यासाठी मार्गदर्शन केले.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी निसर्ग मित्र मंडळाचे नागेश देशपांडे

तसेच जायसवाल महीला संघटन औरंगाबादच्या अध्यक्षा अर्चना उदय जायसवाल,सचीव रितु शैलेंद्र,दिपाली आनंद ,आशीमा संजय ,सरीता आशीषराज,प्रिती मनीषराज,तृप्ती राहूल,काजल अभिषेक इत्यादी जायसवाल महीला संघटन सदस्य

आदींनी विशेष परिश्रम घेतले.

या प्रसंगी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विजयजी जायसवाल ,अध्यक्षा स्वाती विजय,श्री उदय जायसवाल यांची विशेष उपस्थिती होती.

Wednesday, 2 March 2022

दोन दिवसीय पक्षी महोत्सव निसर्ग मित्र मंडळ औरंगाबाद





दोन दिवसीय पक्षी महोत्सव

5 व 6 मार्च रोजी निसर्ग मित्र मंडळ व एन्व्हायर्नमेंटल रिसर्च फौंडेशन आणि एज्युकेशनल अकॅडमी,औरंगाबाद द्वारे आयोजन


औरंगाबाद : निसर्ग मित्र मंडळ व एन्व्हायर्नमेंटल रिसर्च फौंडेशन आणि एज्युकेशनल अकॅडमी औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच रोटरी क्लब औरंगाबाद सेंट्रल यांच्या सहकार्याने दोन दिवसीय पक्षी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पाच व सहा मार्च रोजी औरंगाबाद येथे या महोत्सवाअंतर्गत निसगप्रेमी पक्षीमित्रांनी काढलेल्या छायाचित्रांचा तसेच माध्यमकर्मी छायाचित्रकारांच्या पक्ष्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. औरंगाबाद परिसरातील पक्ष्यांचे अभ्यासक, ज्येष्ठ पक्षीमित्र डॉ. श्री दिलीप यार्दी व पक्षीमित्र श्री किशोर गठडी यांची खास मुलाखत श्री वेद जहागीरदार घेणार आहेत. 
या महोत्सवाचे उदघाटन ५ मार्च रोजी वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक श्री सत्यजित गुजर यांच्या हस्ते सकाळी १० वाजता होईल या प्रसंगी श्री अमितकुमार मिश्रा (उप वनसंरक्षक), डॉ. राजेंद्र नाळे (सहाय्यक वनसंरक्षक) आणि सरताज पठाण (अध्यक्ष रोटरी क्लब औरंगाबाद सेंट्रल) यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती असेल. तापडिया रंग मंदिरच्या कला दालनात हा पक्षी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
   
रविवार दिनांक ०६ मार्च रोजी सकाळी ६ ते ०९:३० दरम्यान जायकवाडी पक्षी अभयारण्य (पैठण)  येथे खास पक्षी निरीक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. विविध पक्षी पाहण्याची संधी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली येथे पक्षीप्रेमींना लाभणार आहे. यासाठी लांब पल्ल्याच्या दुर्बिणीची  व्यवस्था करण्यात आलेली आहे.  
जायकवाडी येथील पक्षी निरीक्षणासाठी नोंदणी अत्यावश्यक असून दिनांक ०४ मार्च  ही  त्याची अंतिम तारीख आहे. पक्षी महोत्सवाच्या निमित्ताने दिनांक ०५ मार्च ते ०६ मार्च  २०२२ या कालावधीत पक्ष्यांवरील छायाचित्रांचे प्रदर्शन तापडिया कला दालनात आयोजित करण्यात आलेले आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी  खुले असून  मोफत  आहे. 
पक्षी महोत्सव तसेच विविध स्पर्धांसाठी भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहन डॉ. दिलीप यार्दी,  किशोर गठडी,  श्री.सतीश जोशी, किरण परदेशी, कुणाल विभांडीक, नागेश देशपांडे, महेंद्र देशमुख, श्रद्धा देवाधे, स्वरदा जोशी यांनी केले आहे. हा सर्व महोत्सव शासनाच्या कोविड विषयक मार्गदर्शक तत्वांनुसार पार पडणार आहे.  येणाऱ्या पक्षीप्रेमींनी देखील सर्व नियमांचे पालन करावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Sunday, 7 November 2021

सुखना जलाशयात आढळला लाल मानेचा ससाणा (red-necked falcon red)#किशोर_गठडी













आज रविवार दिनांक 7 नोव्हेंबर रोजी औरंगाबाद जवळील सुखना मध्यम प्रकल्पात अतिशय दुर्मिळ  असलेला लाल मानेचा ससाणा((red-necked falcon) या पक्ष्याचा दर्शन पक्षी मित्रांना झाले.निसर्ग मित्र मंडळ व पक्षी मित्र संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पक्षी सप्ताह निमित्य कार्यक्रमात झाले


या विषयी अधिक माहिती सांगताना निसर्ग मित्र मंडळाचे सचिव श्री किशोर गठडी म्हणाले की लाल मानेचा ससाणा (शास्त्रीय नावः Falco peregrinus) हा भारतात अतिशय दुर्मिळ पक्षी असून ससाणा जातीतील शिकारी पक्षी आहे.चपळ शरीर, व अतिशय वेगवान हालचाली करून उडणाऱ्या पक्ष्यांची शिकार करण्यात पटाईत आहे. डोक्यावरच्या तसेच माणेवरच्यां लाल रंगावरून हा पक्षी ओळखता येतो.

पक्षी मित्र केदार चौधरी यांनी असे सांगितले की साधारणतः जोडीने शिकार करणाऱ्या या पक्ष्याचे दुर्मिळ होण्याचे मुख्य कारण डीडीटी या कीटकनाशकाचा मोठया प्रमाणावरील वापर हे आहे .ससाणा आपल्या शिकारीचा आकाशातुन पाठलाग वेग सरासर २५० ते ३०० प्रती तास एवढा वेग संपादन करु शकतो

या पक्षी अभ्यासात सुमारे 41 विवीध प्रकारच्या पक्ष्यांच्या नोंदी सुखना परिसरात या प्रसंगी पक्षी मित्रांनी घेतल्या

निसर्ग मित्र मंडळ औरंगाबाद तसेच महाराष्ट्र पक्षिमित्र संघटने तर्फे "०५ नोव्हेंबर या आ. मारूती चितमपल्ली यांचे जन्मदिनापासुन ते १२ नोव्हेंबर या पै. डॉ. सालिम अली यांच्या जयंतीचे औचित्य साधून हा आठवडा पक्षीसप्ताह साजरा केल्या जात आहे. 

यावर्षी सुद्धा निसर्ग मित्र मंडळतसेच महाराष्ट्र पक्षीमित्र संघटने तर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. सुखना जलाशयात आयोजित पक्षी निरीक्षणात पक्षीमित्र किशोर गठडी, पक्षी मित्र केदार चौधरी लालासाहेब चौधरी,महेंद्र देशमुख,आदी सहभागी झाले होते.

औरंगाबादहुन सुमारे 22 किमी अंतरावर असलेल्या सुखणा मध्यम प्रकल्पात दरवर्षी निसर्ग मित्र मंडळातर्फे पक्ष्यांच्या नोंदी घेण्यात आल्या 

या पक्षी निरीक्षणात प्रामुख्याने खालील पक्ष्यांच्या नोंदी घेण्यात आल्या

 (red-necked falcon) पांढऱ्या मानेचा ससाणा,चक्रवाक,चमचा (दर्विमुख),black 

Spot billed duck -  राखी बदक,

Pintail duck - तलवार बदक,

Green bea eater - वेडा राघू,

Sea gull - कुरव पक्षी,

White breasted waterhen - पांढरया छातीची पाणकोंबडी,

White breasted kingfisher - खंड्या,

Wood shrike - काष्ठ खाटिक,

Black drongo - कोतवाल,

River tern - नदीसुरय,

Grey heron -  राखी बगळा,

Black winged kite - कापशी घार,

Pied bushchat - गप्पीदास,

Spotted dove - ठिपक्यांचा होला,

Black winged stilt - शेकाट्या,

Yellow wagtail - पिवळा धोबी,

Painted stork - रंगीत करकोचा,

Great Reed warbler - मोठा वटवट्या,धान तिरचिमणी, 

पांथळ चरचरी (PADDY-FIELD PIPIT)ऑस्प्रे आदी 41 पक्ष्यांच्या नोंदी घेण्यात आल्या

Wednesday, 16 June 2021

सायकलपटू संतोष बालगीर यांचा निसर्ग मित्र मंडळातर्फे सत्कार

 


सायकलपटू संतोष बालगीर यांचा सत्कार

संजीवनी सफर या मोहिमेअंतर्गत जागतिक वारसा स्थळांचे संवर्धन व संरक्षण तसेच भारतीय सैनिकांना मानवंदना हा संदेश घेऊन
श्री संतोष बालगीर हे गेल्या 20 डिसेंबर 2020 पासून लातूर येथून भारत भ्रमंती वर आहेत.त्यांनी महाराष्ट्र कर्नाटक केरळ तामिळनाडू पांडेचरी आंध्र प्रदेश तेलंगाना मध्य प्रदेश उत्तर प्रदेश दिल्ली हरियाणा पंजाब जम्मू आणि काश्मीर हिमाचल प्रदेश हरियाणा राजस्थान गुजरात मार्गे महाराष्ट्र अशा अकरा हजार नऊशे किलोमीटरचा प्रवास सायकल वर केलेला असून  ते 177व्या दिवशी औरंगाबाद येथे आलेले आहेत.या त्यांच्या यशस्वी मोहिमेचा गौरव म्हणून मंगळवार दिनांक 15 जून रोजी निसर्ग मित्र मंडळाचे सचिव किशोर गठडी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी श्री संतोष बालगीर यांनी या सायकल  वरील त्यांच्या साहसी अभियानात देशाच्या विविध प्रातांत आलेले अनेक अदभूत अनुभव चर्चेद्वारे  उपस्थित मान्यवरासोबत सामायिक केले या प्रसंगी निसर्ग मित्र मंडळाचे श्री प्र रं पानसे,श्री नागेश देशपांडे, श्री महेंद्र देशमुख, अँड.श्री सुनील बोरा,अँड श्री धाबेकर,श्री संजीव महल्ले,क्षितिज गठडी,मिहीर दीक्षित,वैभव गाडेकर,मयांक आदी निसर्ग मित्रमंडळाचे स्वयंसवेक उपस्थित होते



Tuesday, 7 January 2020

पक्षी मित्र सम्मेलन,वर्धा ते रेवदंडा सायकल यात्रेच औरंगाबाद तेथे निसर्ग मित्र मंडळातर्फे स्वागत



#महाराष्ट्र राज्य 33 वे पक्षी मित्र सम्मेलन

#वर्धा ते रेवदंडा सायकल यात्रेच औरंगाबाद येथे



निसर्ग मित्र मंडळातर्फे स्वागत

#सायकल रॅली द्वारे पक्षी संवर्धनाचा संदेश

पक्ष्यांचे अधिवास प्रदुषणमुक्त ठेवायचे असतील तर पक्षीमित्रांनी पक्ष्यांसाठी सायकलने भ्रमंती करावी, हा संदेश घेऊन  वर्धाहुन चार पक्षीमित्र सायकलस्वार वर्धा ते रेवदंडा सायकलवारी करत आहेत.
कोकणातील रेवदंडा येथे महाराष्ट्र पक्षी मित्र संघटना व अमेझिंग नेचर क्लब यांच्या वतीने 33 वे महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन दि.11व 12 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेले आहे.
पक्षिमित्र सम्मेलनासाठी औरंगाबादहुंन निसर्ग मित्र मंडळाचे अनेक सदस्य या सम्मेलनात सहभागी होणार आहेत त्याच प्रमाणे राज्याच्या सर्वच भागातून पक्षी प्रेमी या सम्मेलनात सहभागी होणार आहेत.
वर्ध्याहून बहार फाऊंडेशनच्या पक्षीमित्रांनी पर्यावरणाशी केलेली मैत्री जोपासत सम्मेलनात सहभागी होण्यासाठी सायकल सफरीची निवड केली. यासाठी महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे विदर्भ समन्वयक दिलीप वीरखडे, बहारचे अध्यक्ष प्रा. किशोर वानखडे, सदस्य दर्शन दुधाने आणि दीपक गुढेकर असे या उपक्रमातील सहभागी पक्षीमित्रांचे नावे आहेत. हे चौघे पक्षी अभ्यासक शनिवार दिनांक 4 जानेवारी रोजी वर्ध्याहून  सायकल वारी करत आहेत. वर्ध्याहून निघालेली ही सायकलवारी कारंजा-मेहकर-लोणार-जालना-औरंगाबाद-अहमदनगर-तळेगाव-अलिबाग मार्गे रेवदंडा येथे जाणार असुन ते सुमारे 800 किमी अंतर पार करणार आहे. या दरम्यान या मार्गावरील पक्षीमित्र त्यांचे स्वागत करत असुन,  स्थानिक निसर्ग प्रेमिंशी ते संवाद साधत आहेत.
आज मंगळवार दि 7 जानेवारी रोजी सकाळी या सायकलवारीने औरंगाबादहुन निघून अहमदनगर कडे प्रस्थान केले.या प्रसंगी महाराष्ट पक्षी मित्र संघटनेचे व निसर्ग मित्र मंडळाचे सचिव श्री किशोर गठडी व सहकाऱ्यांनी त्यांना निरोप दिला
तत्पूर्वी औरंगाबाद येथे या सायकलस्वारांचे निसर्ग मित्र मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आले. याप्रसंगी मंडळाचे पी आर पानसे,नागेश देशपांडे,प्रा श्रीराम जाधव,सुनील बोरा,कविता गठडी,महेंद्र देशमुख आदी कार्यकर्ते उपस्थीत होते.

Monday, 1 July 2019

निसर्ग मित्र मंडळ औरंगाबाद यांच्या वतीने सीड बॉल कार्यशाळा व वृक्षारोपण

आज सोमवार दि.1 जुलै रोजी सुधाकरराव नाईक हायस्कुल हनुमान नगर N4 येथे निसर्ग मित्रमंडळा च्या पुढाकाराने व सुधाकरराव नाईक शाळेच्या सहकार्याने  सीड बॉल कार्यशाळा व वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्याची काही क्षणचित्रे








Sunday, 13 August 2017

निसर्ग मित्र मंडळातर्फे शाडूमाती गणपती मुर्ती बनवण्याची कार्यशाळा

निसर्ग मित्र मंडळातर्फे शाडूमाती गणपती मुर्ती बनवण्याची रविवारी कार्यशाळा

येथील निसर्ग मित्रमंडळा तर्फे तसेच पन्नालालनगर विकास संस्थेच्या सहकार्याने येत्या रविवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी पर्यावरणपूरक शाडू माती गणपती मूर्ती तयार करण्यासाठीची कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे

निसर्ग मित्रमंडळा तर्फे प्रदूषण मुक्त  गणेशोत्सव हा उपक्रम गेल्या 15 वर्षा पासून सातत्याने राबविला जातो
या मध्ये प्रामुख्याने नागरिकांमध्ये प्रदूषण मुक्त गणेशोत्सव  संदर्भातील जणजागरण,प्लास्टर ऑफ पॅरिस च्या मूर्ती ला पर्यायी पर्यावरणपूरक मूर्ती साठी चे उद्बोधक तसेच विसर्जनाच्या दिवशी शहरातील विविध संघटनांच्या मदतीतीने निर्माल्य संकलन आदी उपक्रम घेतले जातात

पन्नालालनगर विकास संस्थेच्या सहकार्याने आयोजीत ही कार्यशाळा रविवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 11 या दरम्यान श्री अष्टविनायक गणेश मंदिर येथे होणार आहे

या कार्यशाळेत मूर्ती तयार करण्यासाठी लागणाऱ्या शाडू मातीची व्यवस्था करण्यात आली आहे

साेबत आणावयाचे साहीत्य:- जाड पूठ्ठा,पाण्यासाठी मग, रद्दी पेपर,हात पूसण्यासाठी कपडा

या कार्यशाळेत सहभाग घेण्यासाठी अगोदर नाव नोंदवणे आवश्यक आहे .अधिक माहिती व नाव नोंदणी करीता मंडळाचे
श्री नागेश देशपांडे मो.9420400383
तसेच पन्नलाल विकास संस्थेचे अध्यक्ष श्री उदय जैस्वाल मो. 9422217479

येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे

किशोर गठडी
सचिव,निसर्ग मित्र मंडळ औरंगाबाद

Monday, 10 July 2017

अजिंठा परिसर भटकंती व बीजरोपनाला निसर्ग प्रेमींचा चांगला प्रतिसाद

अजिंठा परिसर भटकंती व बीजरोपनाला निसर्ग प्रेमींचा चांगला प्रतिसाद

निसर्ग मित्रा मंडळा तर्फे रविवार दिनांक 9 जुलै रोजी अजिंठा व्ह्यूव पॉईंट ते फरदापुर असा निसर्ग भ्रमंती व बीजरोपनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होतो
या निसर्ग भटकंती व बीजारोपण उपक्रमात  अनेक निसर्ग प्रेमी नागरिक सहभागी झाले होते
सुमारे 8 की मी पायी भटकंतीच्या उपक्रमात उत्साही निसर्ग प्रेमींनी सोबत आणलेल्या विविध झाडांच्या बियाचे रोपण करण्यात आले 
निसर्ग मित्र मंडळा तर्फे दरवर्षी नागरिकांना निसर्ग संवर्धन संरक्षण तसेच निसर्गाची आवड लागावी या करिता हे उपक्रम राबविले जातात
निसर्ग मित्र मंडळाचे सचिव किशोर गठडी यांनी या भटकतीत मार्गदर्शन केले
भटकंती यशस्वी होण्यासाठी
मंडळाचे प्र रं पानसे महेंद्र देशमुख ,सुनील बोरा नागेश देशपांडे,विलास सवडे, आदींनी विशेष परिश्रम घेतले 
या भटकंतीत केदार नाईक अद्वैत गीते अनिकेत अंधारीकर अशोक गुंजाळ सतीश शिंपी विजय वाघमारे रश्मी नांदेडकर ज्योती नांदेडकर प्रशांत वाडगवे मंगेश काटकर आनंद शेरकर वैभवी शेरकर कविता गठडी  श्रवणी गठडी शशिकांत चिंचोलकर काजल चिंचोलकर ब्राम्ही धायताडक सयुरी धायताडक अभिषेक पाटील तेज पाटील शौर्य गायकवाड सतीश मुले संपदा मुळे मानसी मुळे सर्वतम मुळे विजय सवडे विनय सवडे ऋषकेश बारगळ अपर्णा नितटूरकर शिव कुमार निटूरकर भीम लोहार मानसी उमरीकर श्रीधर कार्नेवर वैभव शेळके तुषार भुतेकर निखिल खरगे सत्या आव्हाड संजय खर्चे सुषमा खर्च आशिष खर्च शिवाजी गायकवाड कपिल सुतार तुभा शेळके जितेंद्र नातू नम्रता भुतेकर अथर्व भुतेकर छाया सवडे आदी निसर्ग प्रेमी नागरिक सहभागी झाले होते