To motivate and organise the urban & rural people for conservation of nature and protection of the environment. To carry out scientific studies of ecosystems like forests, lakes, etc., To create awareness among the people activities such as lectures, slide shows, nature camps, & conservation workshops. To carry out projects for prevention of pollution. To organise study and adventure tours.
Wednesday, 16 June 2021
सायकलपटू संतोष बालगीर यांचा निसर्ग मित्र मंडळातर्फे सत्कार
Saturday, 1 February 2020
Tuesday, 7 January 2020
पक्षी मित्र सम्मेलन,वर्धा ते रेवदंडा सायकल यात्रेच औरंगाबाद तेथे निसर्ग मित्र मंडळातर्फे स्वागत
#महाराष्ट्र राज्य 33 वे पक्षी मित्र सम्मेलन
#वर्धा ते रेवदंडा सायकल यात्रेच औरंगाबाद येथे
निसर्ग मित्र मंडळातर्फे स्वागत
#सायकल रॅली द्वारे पक्षी संवर्धनाचा संदेश
पक्ष्यांचे अधिवास प्रदुषणमुक्त ठेवायचे असतील तर पक्षीमित्रांनी पक्ष्यांसाठी सायकलने भ्रमंती करावी, हा संदेश घेऊन वर्धाहुन चार पक्षीमित्र सायकलस्वार वर्धा ते रेवदंडा सायकलवारी करत आहेत.
कोकणातील रेवदंडा येथे महाराष्ट्र पक्षी मित्र संघटना व अमेझिंग नेचर क्लब यांच्या वतीने 33 वे महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन दि.11व 12 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेले आहे.
पक्षिमित्र सम्मेलनासाठी औरंगाबादहुंन निसर्ग मित्र मंडळाचे अनेक सदस्य या सम्मेलनात सहभागी होणार आहेत त्याच प्रमाणे राज्याच्या सर्वच भागातून पक्षी प्रेमी या सम्मेलनात सहभागी होणार आहेत.
वर्ध्याहून बहार फाऊंडेशनच्या पक्षीमित्रांनी पर्यावरणाशी केलेली मैत्री जोपासत सम्मेलनात सहभागी होण्यासाठी सायकल सफरीची निवड केली. यासाठी महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे विदर्भ समन्वयक दिलीप वीरखडे, बहारचे अध्यक्ष प्रा. किशोर वानखडे, सदस्य दर्शन दुधाने आणि दीपक गुढेकर असे या उपक्रमातील सहभागी पक्षीमित्रांचे नावे आहेत. हे चौघे पक्षी अभ्यासक शनिवार दिनांक 4 जानेवारी रोजी वर्ध्याहून सायकल वारी करत आहेत. वर्ध्याहून निघालेली ही सायकलवारी कारंजा-मेहकर-लोणार-जालना-औरंगाबाद-अहमदनगर-तळेगाव-अलिबाग मार्गे रेवदंडा येथे जाणार असुन ते सुमारे 800 किमी अंतर पार करणार आहे. या दरम्यान या मार्गावरील पक्षीमित्र त्यांचे स्वागत करत असुन, स्थानिक निसर्ग प्रेमिंशी ते संवाद साधत आहेत.
आज मंगळवार दि 7 जानेवारी रोजी सकाळी या सायकलवारीने औरंगाबादहुन निघून अहमदनगर कडे प्रस्थान केले.या प्रसंगी महाराष्ट पक्षी मित्र संघटनेचे व निसर्ग मित्र मंडळाचे सचिव श्री किशोर गठडी व सहकाऱ्यांनी त्यांना निरोप दिला
तत्पूर्वी औरंगाबाद येथे या सायकलस्वारांचे निसर्ग मित्र मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आले. याप्रसंगी मंडळाचे पी आर पानसे,नागेश देशपांडे,प्रा श्रीराम जाधव,सुनील बोरा,कविता गठडी,महेंद्र देशमुख आदी कार्यकर्ते उपस्थीत होते.
Monday, 1 July 2019
निसर्ग मित्र मंडळ औरंगाबाद यांच्या वतीने सीड बॉल कार्यशाळा व वृक्षारोपण
Monday, 20 May 2019
Sunday, 13 August 2017
निसर्ग मित्र मंडळातर्फे शाडूमाती गणपती मुर्ती बनवण्याची कार्यशाळा
निसर्ग मित्र मंडळातर्फे शाडूमाती गणपती मुर्ती बनवण्याची रविवारी कार्यशाळा
येथील निसर्ग मित्रमंडळा तर्फे तसेच पन्नालालनगर विकास संस्थेच्या सहकार्याने येत्या रविवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी पर्यावरणपूरक शाडू माती गणपती मूर्ती तयार करण्यासाठीची कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे
निसर्ग मित्रमंडळा तर्फे प्रदूषण मुक्त गणेशोत्सव हा उपक्रम गेल्या 15 वर्षा पासून सातत्याने राबविला जातो
या मध्ये प्रामुख्याने नागरिकांमध्ये प्रदूषण मुक्त गणेशोत्सव संदर्भातील जणजागरण,प्लास्टर ऑफ पॅरिस च्या मूर्ती ला पर्यायी पर्यावरणपूरक मूर्ती साठी चे उद्बोधक तसेच विसर्जनाच्या दिवशी शहरातील विविध संघटनांच्या मदतीतीने निर्माल्य संकलन आदी उपक्रम घेतले जातात
पन्नालालनगर विकास संस्थेच्या सहकार्याने आयोजीत ही कार्यशाळा रविवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 11 या दरम्यान श्री अष्टविनायक गणेश मंदिर येथे होणार आहे
या कार्यशाळेत मूर्ती तयार करण्यासाठी लागणाऱ्या शाडू मातीची व्यवस्था करण्यात आली आहे
साेबत आणावयाचे साहीत्य:- जाड पूठ्ठा,पाण्यासाठी मग, रद्दी पेपर,हात पूसण्यासाठी कपडा
या कार्यशाळेत सहभाग घेण्यासाठी अगोदर नाव नोंदवणे आवश्यक आहे .अधिक माहिती व नाव नोंदणी करीता मंडळाचे
श्री नागेश देशपांडे मो.9420400383
तसेच पन्नलाल विकास संस्थेचे अध्यक्ष श्री उदय जैस्वाल मो. 9422217479
येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे
किशोर गठडी
सचिव,निसर्ग मित्र मंडळ औरंगाबाद























