निसर्ग मित्र मंडळा तर्फ़े ’प्रदुषण मुक्त गणेश उत्सव’ साजरा करण्याचे आवाहन
औरंगाबाद दि २० :गणेशोत्सवाच्या काळात मोठया प्रमानात होणारे प्रदुषण लक्षात घेता .निसर्ग मित्रमंड्ळ व शहरातील विविध निसर्ग प्रेमी संस्था हे गेल्या कांही वर्षा पासुन प्रयत्न करत आहेत.याचाच एक भाग म्हणून याही वर्षी निसर्ग मित्रमंड्ळ व शहरातील विविध निसर्ग प्रेमी संस्थानी शहरातील सर्व गणेश मंडळाना व नागरिकांना ’प्रदुषण मुक्त गणेश उत्सव’ साजरा करण्याचे आवाहन केले आहे.
या गणेशोस्त्व काळात सर्वच गणेश मंड्ळा कडून साक्षरता प्रसार , वॄक्ष संवर्धन राष्ट्रीय एकात्मता,या सारख्या विषयांवर मह्त्वपुर्ण कार्य केले जाते. तसेच गणेशाच्या सुशोभीकरणा साठी थर्माकोल ,चमकी,प्लास्टीक या सारख्या लवकर विघट्न न होनारया गोष्टीचा वापर होतो. ह्या मुळे भूप्रदुषण होते तसेच मोठ्या आवजात वाद्ये वाजवीले जात असल्या कारणाने मोठ्या प्रमानात ध्वनी प्रदुषनात भर पडत असते त्या मुळे गणेश भक्तांनि गणपती आरासा करिता थर्माकोल,चमकी,प्लास्टीक आदी सारख्या वस्तुंचा वापर टाळावा.लाउड स्पीकर,डिजे इ.चे आवाज मर्यादीत ठेवावे आरोग्यास हानीकारक ठरणारे गुलालाचा कमीत कमी वापर करावा.घरोघरी शाडू मातीच्या मुर्तीची स्थापना करुन ते पाणि परस बागेत टाकावे.निर्माल्य विहिरीत न टाकता पर्यावरन प्रेमी संस्थांच्या कार्यकर्त्या कडे द्यावे अथवा योग्य विल्हेवाट लावावी असे आवाहन मंडाळाचे प्रा.विजय दिवाण,दिलीप यार्दी,मानसीँगराव पाटील,किशोर गठडी ,डाँ.पी.एस. कुलकर्णी,डाँ. क्षमा खोब्रागडे, प्रं.रं.पानसे ,मयुरेश डबरी नागेश देशपांडे, मुकुंद फ़ुलगीरकर ,पद्मा तापडीया आदींनी केले आहे.
किशोर गठडी
सचिव