Nisarga Mitra Mandal Aurangabad

Wednesday 9 November, 2022

औरंगाबाद च्या माळरानावर निसर्ग मित्र मंडळाला आढळला दुर्मिळ इजिप्सियन गिधाड पक्षी (Egyptian vulture)

 औरंगाबाद च्या माळरानावर आढळला दुर्मिळ इजिप्सियन गिधाड पक्षी  (Egyptian vulture)

औरंगाबाद दिनांक ०८ नोव्हेंबर २०२२ 





औरंगाबाद  येथील निसर्ग मित्रमंडळ व महाराष्ट्र पक्षी मित्र संघटना  यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा होत असलेला पक्षी सप्ताह २०२२ या अंतर्गत औरंगाबाद  येथील निसर्ग मित्रमंडळ या संस्थेने दिनांक ०८ नोव्हेंबर २०२२ रोजी माळरानावरील पक्षी निरीक्षण तसेच ई-बर्ड अँप प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली हा उपक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद  या ठिकाणी असलेल्या गोगाबाबा टेकडी परिसरात घेण्यात आला 

औरंगाबाद  येथील निसर्ग मित्रमंडळ या संस्थेचे सभासद व शहरातील पक्षीपेमी यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती होते 

दुपारी ०३.३० वाजता पक्षी निरीक्षणास सुरवात झाली निसर्ग मित्र मंडळाचे सचिव व पक्षी मित्र संघटनेचे श्री किशोर गठडी यांनी पक्षी सप्ताह २०२२ बद्दल माहिती दिली तसेच पक्षी निरीक्षण, पक्ष्यांची ओळख व त्यांच्या नोंदी कश्या घ्याव्या याची माहिती दिली याच बरोबर पक्षी अभ्यासक श्री. किरण परदेशी यांनी ई-बर्ड या पक्ष्यांच्या विषयी काम करणाऱ्या अँप विषयी माहिती व प्रशिक्षण दिले त्यानंतर प्रत्यक्ष पक्षी निरीक्षणास सुरवात झाली. पक्षी निरीक्षणासाठी शहरातील अनेक अबाल वुद्ध निसर्ग प्रेमी उपस्थित होते. दुर्बिणीचा वापर करून पक्षी निरीक्षण करण्यात आले. पक्षी निरीक्षण दरम्यान पक्षी अभ्यासक श्री. किरण परदेशी यांना अचानक दुर्मिळ इजिप्सियन गिधाड पक्षी  (Egyptian vulture) माळरानावर आकाशात घिरट्या घालताना आढळले. श्री. किरण परदेशी यांनी तात्काळ हि गोष्ट जेष्ठ पक्षी अभ्यासक श्री. किशोर गठडी याच्या कानावर घातली. पक्षी अभ्यासक व वन्यजीव छायाचित्रकार श्री .विलास सवडे यांनी त्यांच्या कॅमऱ्यामधून या दुर्मिळ इजिप्सियन गिधाड पक्षी  (Egyptian vulture) चा छायाचित्रे घेण्याचा पर्यंत केला आणि एक दोन अस्पष्ट असे छायाचित्रे त्यांना मिळाले. हे गिधाड अत्यंत वेगाने उंच आकाशात घिरट्या घालत उडून दूर निघून गेले. 

या संदर्भात अधिक माहिती देतांना श्री किशोर गठडी व किरण परदेशी यांनी सांगितले की पांढरे गिधाड किंवा इजिप्तशियन गिधाड (इंग्रजी: Egyptian Vulture; इजिप्शियन व्हल्चर) हे निओफ्रॉन जातकुळीतील एकमेव गिधाड आहे. ते दक्षिण यूरोप, आफ्रिका आणि आशियात आढळते.

याचा आकार सुमारे घारीएवढा असतो. पूर्ण वाढ झालेल्या नर गिधाडांची लांबी ४७-५२ सेंमी तर मादींची लांबी ५२-५५.५ सेंमी असते. पंखांची लांबी शरीराच्या लांबीच्या २.७ पट असते. सगळे शरीर मळकट पांढऱ्या रंगाचे असते; डोके पिवळे असून त्यावर पिसे नसतात; चोच पिवळी; उडण्याच्या कामी उपयोगी पडणारी पिसे काळी असतात; शेपटी पाचरीसारखी; पंख लांब व टोकदार असतात. नर व मादी दिसायला सारखीच असतात. हे पक्षी एक एकटे किंवा जोडप्याने राहतात.

या पक्षी निरीक्षणात खालील पक्षी प्रजातीची नोंद ई-बर्ड अँप वर घेण्यात आली या नोंदी नवोदित पक्षी निरीक्षकांनी नोंदविल्या आहेत 

१) Grey Francolin (राखी तितर)

२) Spotted Dove (होला)

३) Greater Coucal(भारद्वाज)

४) Indian Nightjar(रातवा)

५) Little Swift (Indian House Swift)(पकोळी)

६) Painted Stork(रंगीत करकोचा)

७) Egyptian Vulture (गिधाड)

८) White-throated Kingfisher (खंड्या)

९) Black Drongo(कोतवाल)

१०) Bay-backed Shrike (खाटीक)

११) Rufous Treepie (टका चोर)

१२) Red-vented Bulbul (बुलबुल)

१३) Jungle Babbler (सातभाई)

१४) Indian Robin(दयाळ)

१५) Baya Weaver (सुगरण)

१६) Bee-eater (वेडा राघू)

या संपूर्ण उपक्रमासाठी निसर्ग मित्रमंडळ औरंगाबादचे श्री. नागेश देशपांडे श्री. महेंद्र देशमुख श्री. विलास सवडे श्री. प्रकाश ठाकूर इत्यादींनी परिश्रम घेतले 

या उपक्रमास शहरातील भीमराज सातदिवे ,योगेश्वरी पुजारी, प्रज्ञा राणा,ईशानी राणा ,सुभाष पुजारी,मिहिका पुजारी बंडू पुजारी, उमा कुलकर्णी ,वैभव देवकर,ज्योती नांदेकर , सुधीर कोर्टीकर, तेजल कोर्टीकर पक्षी प्रेमींची उपस्थिती होती