Nisarga Mitra Mandal Aurangabad

Sunday 11 October, 2009

’प्रदुषण मुक्त दिवाळी सण साजरा करा’ निसर्ग मित्रमंडळाचे आवाहन

निसर्ग मित्रमंडळ

औरंगाबाद

दि.११/१०/२००९

प्रदुषण मुक्त दिवाळी सण साजरा करा निसर्ग मित्रमंडळाचे आवाहन

दिवाळी हा सण म्हणजे प्रकाशाचा सण.विविध प्रकारच्या रोषणाईने पारंपारिक पध्दतीने आपल्या कडे साजरा केला जातो.दिवाळी वा इतर प्रसंगी होणारया फ़टाक्यांच्या आतषबाजी मुळे तसेच अनावश्यक वस्तुंच्या वापरामु्ळे निसर्गाचा असमतोल राखण्यामध्ये आपल्या कडुन नकळ्त भरच पडत असते.

दिवाळीत फ़टाक्याची आतषबाजी हे लहान थोंराचे मुख्य आकर्षण असते.जेवढा फ़टाक्यांचा आवाज मोठा, फ़टाक्यांची माळ मोठी, तेवढी प्रतिष्ठा व जल्लोष मोठा.याच बरोबर अनावश्यक विद्युत दिव्यांची रोषणाई लावण्याची चढाओढ बघावयास मिळते.या मुळे आपल्या कडुन पर्यावरणाचे नुकसान होत असते.

दिवाळी सणात होणारे प्रदुषण मुख्यत: ध्वनि ,वायु,उर्जेचा प्रमाणा बाहेर वापर या मुळे होत असतो.फ़टाक्यांमधल्या रासायनिक द्र्व्यांतून आपले तसेच सभोवताली असलेल्या जैविक विविधतेचे अतोनात नुकसान होत असते. ह्या रासायनिक द्र्व्यांपासुन होणारे नुकसान खालील प्रमाणे आहे

१ नायट्रेट - मज्जातंतु/पेशीची निषक्रीयता

२ नायट्रिट -बेशुध्द होणे

३ लेड (शिषे)-मज्जातंतुवर दुष्परिणाम

४ कॅडमीयम -रक्तातील लोहाचे प्रमाण घटणे,किड्नी निषक्रीय होणे

५ सोडीयम - त्वचेचे विकार

६ झिंक - उलट्या होणे .

७ कॉपर- श्वास नलिकेचे विकार

८ मॅग्नेशियम -त्वचेचे विकार

ध्वनी प्रदुषण: १२५ डेसीबलचे आवाज करणारे फ़टाके मुळे कर्णबधिरता,रक्तदाब वाढ्णे ,ह्र्दयविकार,झोपमोड इ.परिणाम बघावयास मीळतात

अनावश्यक खरेदी : अनावश्यक खरेदी मुळे परिसरातील घन कचरयात वाढ होत असते.

विद्युत रोषणाई : जास्त संख्येत विद्युत दिव्यांचा वापर म्हणजे उर्जा स्त्रोता चा अति वापर व प्रदुषणात भर नागरिकानी ह्या सर्व बांबीचा काळ्जी पुर्वक विचार करुन प्रदुषण मुक्त दिवाळी सण साजरा करावा असे निसर्ग मित्रमंडळाचे प्रा.विजय दिवान, किशोर गठडी, मानसिंगराव पाटील, दिलीप यार्दि, मुकुंद फ़ुलगीरकर,डॉ.दामले अजित,पानसे प्रल्हाद.डॉ.प्रकाश कुलकर्णी ,मयुरेश डबरी ,नागेश देशपाडे,मयुरेश डबरी ,अनघा चीटगोपेकर.रंजन देसाई,डॉ.क्षमा खोब्रागडे कळवतात

किशोर गठडी

सचिव