Nisarga Mitra Mandal Aurangabad

Sunday 21 August, 2022

निसर्ग मित्र मंडळ आयोजित शाडूमाती गणपती मुर्ती कार्यशाळेला चांगला प्रतिसाद


निसर्ग मित्र मंडळ आयोजित शाडूमाती गणपती मुर्ती  कार्यशाळेला चांगला प्रतिसाद








येथील निसर्ग मित्रमंडळ तसेच जायसवाल महिला संघटन या संस्थेच्या सहकार्याने रविवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी जयसवाल भवन रचनाकार कॉलोनी येथे शाडू माती गणपती मूर्ती तयार करण्यासाठीची कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला महिला व विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला.

सुरवातीला जायसवाल महीला संघटन औरंगाबादच्या अध्यक्षा अर्चना उदय जायसवाल यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले

या प्रसंगी मंडळाचे सचिव किशोर गठडी यांनी शाडूच्या मूर्ती नदीत किंवा विहिरीत विसर्जित करू नका तर ते आपल्या घरीच मूर्तीचे विसर्जन करा असे आवाहन केले त्याच प्रमाणे अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करण्याचा उद्देश हा नागरिकानमधे निसर्ग संवर्धनाची जाणीव निर्माण व्हावी हा असून निसर्ग मित्रमंडळा तर्फे  दर वर्षी  प्रदूषण मुक्त  गणेशोत्सव हा उपक्रम गेल्या 20 वर्षा पासून सातत्याने राबविला जातो असे ही त्यांनी नमूद केले.


अशा उपक्रमाद्वारे प्रामुख्याने नागरिकांमध्ये प्रदूषण मुक्त गणेशोत्सव  संदर्भातील जनजागरण,प्लास्टर ऑफ पॅरिस च्या मूर्ती ला पर्यायी पर्यावरणपूरक मूर्ती साठी चे उद्बोधन; तसेच विसर्जनाच्या दिवशी शहरातील विविध संघटनांच्या मदतीने निर्माल्य संकलन आदी उपक्रम घेतले जातात.

या कार्यशाळेत प्रामुख्याने सौ श्रद्धा गाजरे यांनी सहभागीना गणेश मूर्ती तयार करण्यासाठी मार्गदर्शन केले.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी निसर्ग मित्र मंडळाचे नागेश देशपांडे

तसेच जायसवाल महीला संघटन औरंगाबादच्या अध्यक्षा अर्चना उदय जायसवाल,सचीव रितु शैलेंद्र,दिपाली आनंद ,आशीमा संजय ,सरीता आशीषराज,प्रिती मनीषराज,तृप्ती राहूल,काजल अभिषेक इत्यादी जायसवाल महीला संघटन सदस्य

आदींनी विशेष परिश्रम घेतले.

या प्रसंगी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विजयजी जायसवाल ,अध्यक्षा स्वाती विजय,श्री उदय जायसवाल यांची विशेष उपस्थिती होती.