Nisarga Mitra Mandal Aurangabad

Wednesday 2 March, 2022

दोन दिवसीय पक्षी महोत्सव निसर्ग मित्र मंडळ औरंगाबाद





दोन दिवसीय पक्षी महोत्सव

5 व 6 मार्च रोजी निसर्ग मित्र मंडळ व एन्व्हायर्नमेंटल रिसर्च फौंडेशन आणि एज्युकेशनल अकॅडमी,औरंगाबाद द्वारे आयोजन


औरंगाबाद : निसर्ग मित्र मंडळ व एन्व्हायर्नमेंटल रिसर्च फौंडेशन आणि एज्युकेशनल अकॅडमी औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच रोटरी क्लब औरंगाबाद सेंट्रल यांच्या सहकार्याने दोन दिवसीय पक्षी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पाच व सहा मार्च रोजी औरंगाबाद येथे या महोत्सवाअंतर्गत निसगप्रेमी पक्षीमित्रांनी काढलेल्या छायाचित्रांचा तसेच माध्यमकर्मी छायाचित्रकारांच्या पक्ष्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. औरंगाबाद परिसरातील पक्ष्यांचे अभ्यासक, ज्येष्ठ पक्षीमित्र डॉ. श्री दिलीप यार्दी व पक्षीमित्र श्री किशोर गठडी यांची खास मुलाखत श्री वेद जहागीरदार घेणार आहेत. 
या महोत्सवाचे उदघाटन ५ मार्च रोजी वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक श्री सत्यजित गुजर यांच्या हस्ते सकाळी १० वाजता होईल या प्रसंगी श्री अमितकुमार मिश्रा (उप वनसंरक्षक), डॉ. राजेंद्र नाळे (सहाय्यक वनसंरक्षक) आणि सरताज पठाण (अध्यक्ष रोटरी क्लब औरंगाबाद सेंट्रल) यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती असेल. तापडिया रंग मंदिरच्या कला दालनात हा पक्षी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
   
रविवार दिनांक ०६ मार्च रोजी सकाळी ६ ते ०९:३० दरम्यान जायकवाडी पक्षी अभयारण्य (पैठण)  येथे खास पक्षी निरीक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. विविध पक्षी पाहण्याची संधी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली येथे पक्षीप्रेमींना लाभणार आहे. यासाठी लांब पल्ल्याच्या दुर्बिणीची  व्यवस्था करण्यात आलेली आहे.  
जायकवाडी येथील पक्षी निरीक्षणासाठी नोंदणी अत्यावश्यक असून दिनांक ०४ मार्च  ही  त्याची अंतिम तारीख आहे. पक्षी महोत्सवाच्या निमित्ताने दिनांक ०५ मार्च ते ०६ मार्च  २०२२ या कालावधीत पक्ष्यांवरील छायाचित्रांचे प्रदर्शन तापडिया कला दालनात आयोजित करण्यात आलेले आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी  खुले असून  मोफत  आहे. 
पक्षी महोत्सव तसेच विविध स्पर्धांसाठी भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहन डॉ. दिलीप यार्दी,  किशोर गठडी,  श्री.सतीश जोशी, किरण परदेशी, कुणाल विभांडीक, नागेश देशपांडे, महेंद्र देशमुख, श्रद्धा देवाधे, स्वरदा जोशी यांनी केले आहे. हा सर्व महोत्सव शासनाच्या कोविड विषयक मार्गदर्शक तत्वांनुसार पार पडणार आहे.  येणाऱ्या पक्षीप्रेमींनी देखील सर्व नियमांचे पालन करावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.